Pune Crime | 37 लाखाच्या फसवणूक प्रकरणी ‘इंडिया होम लोन’च्या 3 अधिकार्‍यांविरूध्द पुण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | 37 lakh fraud case filed against 3 officers of India Home Loan Limited in Pune find out the case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | लोकांच्या अडीअडचणीला धावून येत असल्याचे सांगून त्यांना कर्ज देण्याचे आमिष खासगी फायनान्स कंपन्यांकडून (Finance Company) दाखवले जाते. मात्र, हे करताना या कंपन्यांमधील अधिकारी कशी मनमानी करुन लोकांची कशी पिळवणूक तसेच फसवणूक (Cheating Case) करतात, याची उदाहरणे सातत्याने समोर येत आहे. सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth, Pune) एका फायनान्स कंपनीतील अधिकार्‍यांचे कारनामे समोर आले आहेत. (Pune Crime)

बांधकाम होणार नसल्याचे माहिती असूनही बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन ते फायनान्स कंपनीत सादर करुन कर्ज मंजुरीसाठी तरुणाकडून २ लाख रुपये घेतले. कर्ज काढण्यासाठी दिलेल्या धनादेशावर स्वत: रक्कम लिहून तो बाऊन्स करुन उलट या तरुणाविरुद्ध कोर्टात केस (Court Case) केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी उमेश नांगरे (वय ४३, रा. धायरी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन योगेंद्र रघुनाथ खिस्ते Yogendra Raghunath Khiste (वय ५०, रा. सदाशिव पेठ), मितेश महेश पुजारी Mitesh Mahesh Pujari (वय ४४, रा. लोक एव्हरेस्ट, मुलुंड वेस्ट, मुंबई), प्रेम अडवाणी Prem Advani (वय ४०, रा. निर्मल एक्सप्रेस, मुलुंड, मुंबई) व इतर अधिकारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्व इंडिया होम लोन (India Home Loan Limited) या फायनान्स कंपनीचे अधिकारी आहेत. हा प्रकार १ ऑक्टोबर २०१७ ते ३१ ऑगस्ट २०१९ दरम्यान सदाशिव पेठेतील इंडिया होम लोन कंपनीच्या कार्यालयात घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया होम लोन ही कर्ज पुरवठा करणारी कंपनी आहे. या कंपनीतील अधिकार्‍यांनी आपसात संगनमत करुन योगेद्र खिस्ते याने मुंबई – पुणे रोडवरील (Mumbai – Pune Road) बाणेर (Baner) येथील वास्त हाईटस या नावाच्या इमारतीचे बांधकाम होणार नसल्याची माहिती होती. असे असताना बांधकाम होत असल्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार केली. ती फायनान्स कंपनीला सादर केली.
फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍यांनी कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता त्याआधारे कर्ज मंजुरीसाठी फिर्यादीकडून २ लाख रुपये घेतले.

फिर्यादी यांच्या नावाने इंडिया होम लोन लिमिटेडमध्ये ३५ लाख ६७ हजार रुपयांचे कर्ज काढून फिर्यादीची एकूण ३७ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांनी कर्ज काढण्यासाठी दिलेले धनादेशावर स्वत: रक्कम लिहून तो बँकेत टाकला. बँक खात्यात इतके पैसे नसल्याने तो परत गेला. (बाऊन्स झाला) त्यानंतर फिर्यादी विरुद्ध कोर्टात केस दाखल करुन त्यांची संगनमताने फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 37 lakh fraud case filed against 3 officers of India Home Loan Limited in Pune find out the case

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 51 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी