अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – Ahmednagar District Hospital Fire Case | अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) लागलेल्या आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (District Surgeon Dr. Sunil Pokhrana) यांना दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. तसेच त्यांना अटक (Arrest) करण्यात आली. यापूर्वीच त्यांनी अटकपूर्व जामीन (Pre – Arrest Bail) मिळाल्याने त्यांची जबाब देऊन सुटका करण्यात आली. 30 जानेवारी रोजी ‘पोलीसनामा’ (policenama) वर त्या पंधरा जणांचा दोष काय ? या मथळ्याखाली सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अभय दिले जात असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आग प्रकरणातील चौकशी अहवालात प्रथमदर्शनी दोषी आढळून येणारे इतर अधिकारीबाबत अजूनही कडक भुमिका घेण्यात आलेली नाही.
आग प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉ. पोखरणा यांना आगीच्या घटनेस दोषी धरले आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला होता. यातील एकाची अजूनही ओळख पटलेली नाही. पोलिसांचा (Ahmednagar Police) तपास (Investigation) सुरू आहे.
Web Title :- Ahmednagar District Hospital Fire Case | Ahmednagar District Surgeon Dr. Sunil Pokhrana arrested in Ahmednagar District Hospital Fire Case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update