पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | वेगवेगळ्या कार्यालयात, कोर्टात तक्रारी दाखल करुन ‘त्या’ मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याप्रकरणी राजेश बजाज (Rajesh Bajaj) व बापू शिंदे (Bapu Shinde) यांच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.
याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीने यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात chaturshringi police station (गु. र. नं. ४४४/२१) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश खैरातीलाल बजाज rajesh khairatilal bajaj (रा. प्रभात रोड) आणि बापू शिंदे (रा. नर्हेगाव) यांच्याविरुद्ध ३८४, ३८५, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना पाषाण येथील साईटवर १९ एप्रिल २०१७ पासून आतापर्यंत घडली आहे फिर्यादी यांना आरोपींनी प्रत्यक्ष भेटून त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या कार्यालयात,
चुकीच्या व खोट्या मजकुराच्या तक्रारी कोर्टात दाखल करुन फिर्यादीवर दबाव टाकून, धमकी देऊन तक्रारी (Pune Crime) मागे घेण्याकरीता १० लाख रुपयांची खंडणी (extortion) मागितली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध जनहित याचिका दाखल करुन ती मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने
राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकास यांना ५० लाखांची खंडणी मागून जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) राजेश बजाज व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे.
याशिवाय दुसर्या एका बिल्डरची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) राजेश बजाज याला यापूर्वी अटक केली होती.
Web Title : Pune Crime | 10 lakh ransom case: Rajesh Bajaj, Bapu Shinde filed another ransom case.
Ajit Pawar | अजित पवारांशी संबंधीत साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री म्हणाले…