बाराबंकी :वृत्तसंस्था – Accident News | एक खासगी प्रवासी वाहतूक बस आणि वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident News) झाला. यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बाराबंकीच्या देवा पोलीस ठाणे परीक्षेत्रातील बबुरी गावाजवळ किसान पथ रिंग रोड येथे आज सकाळी हा अपघात घडला असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बस दिल्लीहून बहराइच येथे पर्यटकांना घेऊन निघाली होती. तर ट्रक वाळूची वाहतूक करत होता.
दोन्ही वाहने समोरासमोरून वेगाने येत होती. त्या वेळी अचानक एक म्हैस समोर आडवी आल्याने दोन्ही वाहनचालकांचे नियंत्रण सुटले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यामुळे, दोन्ही गाड्यांची एकमेकांना धडक (Accident News) बसली. हा अपघात इतका भीषण होता की, आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.
प्रवासी बसमधील नागरिकांनी मोठ-मोठ्याने रडायला सुरुवात केली. त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून जखमींना तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
Web Title : Accident News | accident truck and passenger bus crash barabanki 8 killed spot.
Tata Group | रतन टाटा यांच्या टायटनची बाजारात ‘धूम’, TCS नंतर ‘हा’ टप्पा गाठणारी बनली दुसरी कंपनी
Pune Crime | महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळवून नेणार्या चोरट्याला नागरिकांनी पकडले