बहुजननामा ऑनलाईन
– शिरूर येथे ऑनलाइन सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून ७३ हजार ५०५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दुबई येथे शारजा स्टेडियमवर सुरू असलेल्या राजस्थान रॉयल व दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या ड्रीम इलेव्हन ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यावर शिरूर हलवाई चौक येथे बेटिंग घेत असल्याबाबत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपनीय बातमी मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याबाबत दिलेल्या सुचनेनुसार करून स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि पृथ्वीराज ताटे , पोसई अमोल गोरे, सहा.फौज.दयानंद लीमन, पो.हवा. रौफ इनामदार, पो.ना. मोमीन, शेळके, म.पोना कांबळे, पो.कॉ.अक्षय जावळे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला यावेळी राहुल गोरख घोडके हा बेटिंगचे साहित्य जागेवर टाकून त्याचे बिल्डींग वरुन बाजूचे बिल्डींगवर पळून गेला.
सदर ठिकाणावरून एक इंटेक्स कंपनीचा एलसीडी टीव्ही , विवो कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम रुपये १२२८०, दोन फुलस्केप रजिस्टर, एक सेट टॉप बॉक्स असा एकूण ७३,५०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्याचेवर जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली.