Pune CP Amitesh Kumar | वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यांविरोधात ‘विशेष मोहीम’ – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune CP Amitesh Kumar

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –  Pune CP Amitesh Kumar | पुणे शहरामध्ये मागिल काही दिवसांमध्ये वाहनांची तोडफोड करुन वाहने पेटवण्याच्या घटना वाढत आहेत. याबाबत पोलिसा आयुक्तांना पत्रकार परिषदेत विचारले असता, वाहनांची तोडफोड व जाळपोळ करुन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहिम सुरु केली असून गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले. (Pune Police News)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीन च्या पथकाने साडेतीन कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पोलीस आयुक्त पत्रकारांशी बोलत होते. (Pune CP Amitesh Kumar)

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहरामध्ये तीन ते चार गाड्यांची तोडफोड किंवा पेटवण्याच्या घटना घडल्या आहेत. हा प्रकार पुणे पोलिसांनी गांभीर्याने घेतला आहे. आरोपींचे रेकॉर्ड पाहून त्यांच्यावर एन.पी.डी.ए अंतर्गत कारवाई प्रस्तावीत आहे. गाडी जाळण्याचे जे हॉटस्पॉट आहेत त्यातील आरोपींची ओळख पटवून व रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नागरिकांशी चांगले वागणे ही आमची प्राथमिकता

पोलीस चौकीत किंवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून योग्य वागणूक मिळत नाही,
याबाबत विचारणा केली असता पोलीस आयुक्त म्हणाले, याबाबत आम्ही पूर्णपणे संवेदनशील आहोत.
येत्या काही दिवसांमध्ये हे चित्र बदलले दिसेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. तसेच कर्मचारी व अधिकारी हे
लोकांशी चांगले बोलून त्यांना चांगली वागणूक देतील व त्यांच्या अडचणी सोडवतील, ही आमची प्राथमिकता
असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.