पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Corporation | ऍमेनिटी स्पेस (Amenity Space) ही पुणेकरांची संपत्ती आहे. परंतू निवडणुकांसाठी पक्षनिधी गोळा करण्यासाठी सत्ताधारी भाजपने (BJP) शेवटच्या टप्प्यात त्या दीर्घकाळ भाडेपट्टयाने देण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. थोडक्यात या मिळकती (Pune Corporation) विकण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आमचा विरोध असून तो रद्द करावा यासाठी शासनाकडेही दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळही उपस्थित होत्या. जगताप म्हणाले, की मागील 12 ते 15 वर्षांमध्ये सार्वजनिक वापरासाठी ऍमेनिटी स्पेस (Amenity Space) महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. या ऍमेनिटी स्पेस ही पुणेकरांची संपत्ती असून भविष्यात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करायच्या झाल्यास महापालिकेला जागेची गरज भासणार आहे. परंतू जागाच उपलब्ध नसल्यास त्या सुविधा उभारता येणार नाहीत. किमान 30 टक्के जागा मोकळ्या ठेवाव्यात अशी आमची भुमिका आहे. ऍमेनिटी स्पेसच्या जागांचा वापर करण्याबाबत मास्टरप्लॅन तयार करावा, अशी आमची मागणी होती. मात्र, सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजुर केला. सर्वसाधारण सभेतही आमचा त्याला विरोध राहाणार असून हा प्रस्ताव रद्द करावा यासाठी राज्य शासनाकडेही दाद मागणार आहोत, असे जगताप यांनी यावेळी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान खासदार अॅड. वंदना चव्हाण (mp vandana chavan) यांनीही या प्रस्तावाला विरोध केला आहे.
पुणे शहराचे प्रदूषण झपाट्याने वाढत आहे आणि ते वाढत राहणार आहे.
विकासाच्या नावाखाली झाडे कापली जातात परंतु त्याप्रमाणात झाडे लावली जात नाहीत ७४ व्या घटना दुरुस्तीने महानगरपालिकांनी अर्बन फॉरेस्ट (शहरी वने) विकसित करावी असे बंधन घातले आहे.
ग्लोबल वार्मिंगचे संकट आज आपल्याला भेडसावत आहे
अश्या वेळी मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे ह्याला महत्व प्राप्त झाले आहे.
बांधकाम झाले कि त्याठिकाणी पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया पूर्ण बंद होते
त्याचे परिणाम आपण पावसानंतर झालेल्या पूरपरिस्थितीत अनुभवली आहे
अश्या परिस्थितीत मोकळ्या जागांवर पुन्हा कॉंक्रीट जंगलचा हा घाट सर्व पुणेकरांनी हाणून पाडला पाहिजे.
तसेच सर्वांनी एकत्रित येऊन सदर प्रस्तावाला विरोध करणे हि आजची तातडीची गरज आहे.
Web Title :- Pune Corporation | In order to raise election funds, the BJP plotted to sell the ‘property’ of Punekars through Amenity Space; NCP city president Prashant Jagtap’s allegation.