बहुजननामा ऑनलाईन
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दिसून येत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनोचे 2120 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात पुणे शहरातील तब्बल 43 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील तब्बल 22 जणांचा पुणे शहरात आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू होणार्यांची संख्या 2918 वर जावून पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात 1883 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरात 1 लाख 24 हजार 568 कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 3 हजार 978 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 672 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 936 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 480 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना फेस मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं प्रशासनाकडून वेळावेळी सांगण्यात आलं आहे.