बहुजननामा ऑनलाईन
शहरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसमुळं मृत्यू होणार्यांची संख्या वाढत असताना आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे तसेच कोरोनाचे रूग्ण देखील काही प्रमाणात वाढत आहेत. गेल्या 24 तासात शहरात कोरोनाचे 2078 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात पुणे शहरात कोरोनामुळं 41 जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 23 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं तब्बल 2625 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात तब्बल 2013 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 1 लाख 11 हजार 916 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 92 हजार 614 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 16 हजार 677 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी तब्बल 927 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यापैकी 483 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी कुठल्याही कामासाठी घराबाहेर पाऊल ठेवताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करावं असं आवाहन वेळोवेळी प्रशासनाक