पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईनंतर पुण्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मध्यंतरीच्या काळात राज्यातील कोरोना नियंत्रणात आला असताना फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे शहरात शनिवारी (दि.20) 414 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 247 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शनिवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 634 स्वॅब तपासणी करण्यात आली.
पुणे कोरोना अपडेट : शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
◆ उपचार सुरु : २,५६१
◆ नवे रुग्ण : ४१४ (१,९७,३३०)
◆ डिस्चार्ज : २४७ (१,८९,९४८)
◆ चाचण्या : ४,६३४ (१०,९४,४२७)
◆ मृत्यू : ५ (४,८२१)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/KivrK6vhn7— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 20, 2021
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 160 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 345 रुग्णा ऑक्सिजनवर आहेत. आज दिवसभरात पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 821 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 561 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 97 हजार 330 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 89 हजार 948 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुण्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक रविवारी सकाळी नऊ वाजता कौन्सिल हॉल येथे होणार आहे. उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये अजित पवार पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यामध्ये कोणते कडक निर्बंध लागू करायचे किंवा लॉकडाऊन करायचे यावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर अजित पवार निर्णय घेणार आहे.