नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सबस्क्रायबर्सला ईपीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्याची परवानगी देते. अनेक सदस्यांना आपल्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत हे समजत नाही. सबस्क्रायबर्स ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून ईपीएफ बॅलन्स सुद्धा चेक करू शकतात. तसेच आपले पासबुकसुद्धा डाऊनलोड करू शकतात किंवा त्याची प्रींटआऊट काढू शकतात. यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेवूयात…
स्टेप 1. यामध्ये सर्वप्रथम मेंबरला www.epfindia.gov.in वर जावे लागेल.
स्टेप 2. आता Our Services टॅबपैकी For Employees पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3. आता Services टॅबपैकी Member Passbook वर क्लिक करा.
स्टेप 4. आता लॉग-इन करण्यासाठी आपला UAN आणि पासवर्ड टाका आणि तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचे पासबुक पाहू शकता.
येथे तुमचे अकाऊंट तुमच्या UAN सोबत टॅग असायला हवे. सोबतच तुमचा UAN कंपनीकडून अॅक्टिवेटेड असायला हवा. सबस्क्रायबर्स या पोर्टलवरून पासबुकची प्रिंटसुद्धा काढू शकतात.