पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरात शुक्रवारी (दि.1) 302 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 324 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 140 स्वॅब तपासणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 250 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 160 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 90 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 632 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 294 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 79 हजार 071 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 71 हजार 145 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका यांनी तयार केलेल्या कोविशील्ड लसीचा वापर भारतात सुरु होईल. तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीने घेतला आहे. ब्रिटिश सरकारनं काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.