पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ-उतार पहायला मिळत आहे. शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या जास्त आहे. आज पुणे शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 125 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 65 रुग्ण बरे झाले आहेत.
शहरात आजपर्यंत 45 लाख 11 हजार 144 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 61 हजार 323 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 51 हजार 248 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 727 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 9 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. नाॅन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 01 रुग्ण आहे. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 3.85 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona Update | Diagnosis of 125 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 वाहनांना टोलमाफी बंद
Blood Sugar Level | सकाळच्या वेळी किती असावी शुगरची लेव्हल, आरोग्यासोबत करू नका खेळ
Best Exercise For Slim Body | शरिर सडपातळ करण्यासाठी करा ‘या’ एक्सरसाईज