पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 08 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 2 हजार 673 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 08 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 940 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 169 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 40 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 129 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी (दि.9) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 3 हजार 586 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 50 हजार 520 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona Update | A big drop in the number of corona patients in Pimpri Chinchwad, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 वाहनांना टोलमाफी बंद
Blood Sugar Level | सकाळच्या वेळी किती असावी शुगरची लेव्हल, आरोग्यासोबत करू नका खेळ