पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona) 73 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 74 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे. दरम्यान, आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omycron variant) 7 रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात ओमायक्रॉनची एंट्री झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
पुणे शहरात 6 हजार 219 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 73 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत करण्यात आलेल्या एकूण 37 लाख 80 हजार 546 प्रयोगशाळा तपासणीत 5 लाख 08 हजार 114 जणांना कोरोनाची बाधा (Pune Corona) झाली आहे. यापैकी 4 लाख 98 हजार 143 रुग्णांनी कोरोनामवर मात केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात रुग्णांची संख्या कमी होत असताना शहरात मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरात 9 हजार 109 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 862 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून यामध्ये 85 रुग्ण गंभीर आहेत. तर 56 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona | Omicron’s entry in rural areas raises concerns, 73 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics
Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘गेल्या 24 तासात कोरोना’च्या 902 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
Cristiano Ronaldo Girlfriend List | अबब…! क्रिस्टियानो रोनाल्डोनं 13वर्षात केलं चक्क 18 गर्लफ्रेंडला डेट, यामध्ये होता ‘या’ भारतीय अभिनेत्रीचा समावेश
Vicky Kaushal Airport Viral Video | विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार येताच कैतरिनाच्या पतीनं केलं असं काही.. पाहा व्हायरल व्हिडिओ
Pune News | भाजपने संपूर्ण शहरात लावलेल्या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सत्ताधारी BJP ने लावले नाहीत – राष्ट्रवादी काँग्रेस