पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 260 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 335 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. Pune Corona | 260 new patients of Corona in the last 24 hours in Pune city, know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 87 हजार 165 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार 902 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 08 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8767 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 2496 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2496 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 220 रुग्ण गंभीर आहेत. तर 339 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8450 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 28 लाख 81 हजार 289 तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.41 %
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या 10 लाख 84 हजार 111 इतकी झाली आहे. यापैकी 10 लाख 56 हजार 50 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
सध्या जिल्ह्यामध्ये 9 हजार 858 ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
कोरोनाबाधित एकूण 18 हजार 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.41 टक्के आहे.
Web Title : Pune Corona | 260 new patients of Corona in the last 24 hours in Pune city know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Maharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार ? आज आदेश जारी होण्याची दाट शक्यता
Pune Traffic Police | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल
Flood Affected Area | राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचं सुमारे 1800 कोटींचं नुकसान