पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corona | पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज (बुधवार) रुग्णांची संख्या अधिक असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 257 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 242 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97 हजार 412 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86 हजार 298 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation)
हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8962 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात 2152 अॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 10 हजार 698 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 32 लाख 03 हजार 263 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2152 रुग्ण अॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 212 रुग्ण गंभीर आहेत. तर 290 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title : Pune Corona | 257 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics.
NCP Meeting | राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांच्या बैठकीत शिवसेना-काँग्रेस मंत्र्यांबद्दल नाराजी
Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत कोकणात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह पुण्याला इशारा