पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corona |पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 121 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 174 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 080 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 89 हजार 485 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9014 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यात 1581 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 1581 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 183 रुग्ण गंभीर आहेत. तर 248 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8509 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 33 लाख 22 हजार 753 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune Corona | 174 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics.
Ajit Pawar and Nitin Gadkari | अजित पवारांना सकाळी-सकाळी नितीन गडकरींचा काॅल अन्….