पुणे : बहुजननामा ऑनलाईन – क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यानी एकाला सव्वा लाख रुपयांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी रत्नाकर सुभाष कोकीळ (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे एका खाजगी कंपनीचे क्रेडिट कार्ड आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्याने कंपनीच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच क्रेडिट कार्डचे एक्टिवेशन, जुन्या कार्डची लिमिट वाढवणे आणि जुन्या कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट वापरण्यास दिले जात असून, तुम्हालाही या सर्व सुविधा मिळवून देतो, असे सांगत त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तर त्यांच्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांना कंपनीतून प्रोसेसचा केल्यानंतर एक कोड येईल तो सांगण्यास सांगितले अमी त्यामाध्यमातून त्यांचे क्रेडिट कार्डमधून 1 लाख 37 हजार 238 रुपयांचा काढत फसवणूक केली आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.