पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव जाणार्या एका मिक्सर कंटेनरने हडपसर (Hadapsar) येथे एका पाठोपाठ चार रिक्षा आणि एका कारला धडक दिली असून त्यानंतर तो झाडाला धडकून उलटला आहे. हे झाड एका नागरिकाच्या अंगावर पडले. या अपघातात १ जण जागीच ठार झाला असून ३ जण जखमी झाले आहे. हा अपघात हडपसर येथील गाडीतळाजवळ सकाळी ६ वाजता घडला. (Pune Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिक्सर कंटेनर हा सोलापूर रोडने हडपसर येथील गाडीतळाजवळ आला. त्यावेळी एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे असलेल्या ४ ते ५ रिक्षांना एका पाठोपाठ धडक दिली. एका कारला धडक दिल्यानंतर हा कंटेनर एका झाडाला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की धडकेमुळे झाड कोसळले. कंटेनर उलटला. त्याखाली एक रिक्षा सापडून तिचा चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला असून इतर तिघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्यास सुरुवात केली आहे.
Web Title :- Pune Accident News | A terrible accident in Hadapsar! Mixer container hit 4 rickshaws and a car; 1 killed and 3 injured
हे देखील वाचा :