बहुजननामा ऑनलाइन टीम – अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरबाज शेख (रा. स.नं .४२, ग्रीन पार्क, कोंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी मुलीच्या आजीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या १७ वर्षाच्या नातीला घेऊन भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी नातीला कोणाचा तरी सारखा फोन येत होता. यावेळी तिने आजीला मी कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन येते तू घरी जा असे सांगितले.
त्यानंतर त्या घरी तिची वाट पहात होत्या. त्याचदरम्यान, त्यांच्याकडे एक महिला आली व तिने माझा मुलगा अरबाज शेख हा तुमच्या नातीला घेऊन पळून गेल्याचे त्यांना सांगितले. दोघांचा त्यांनी शोध घेतला पण मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.