बहुजननामा ऑनलाइन टीम – करीना कपूर खान प्रेग्नेंट आहे. सैफ अली खानच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्या दोघांनी ही बातमी दिली होती. दोघांनी एक स्टेटमेंट देत सांगितलं होतं की ते दुसरं बाळ एक्सपेक्ट करत आहेत. त्यानंतर नवाब फॅमिली मध्ये आनंदी आनंद आहे. करिनाने तिचं काम आधीसारखंच सुरु ठेवलं आहे याबद्दलची माहिती ती सोशल मीडियावर देत असते.
तैमूरच्या जन्माच्या वेळी करिना सोशल मीडियावर नव्हती, पण आता दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या वेळी ती इंस्टाग्रामवर आहे. त्यामुळे चाहत्यांना तिचे अपडेट मिळत राहणार आहेत. मंगळवारी एक फोटो शेअर केला, यामध्ये मेकअप रूममध्ये बसलेली आणि सोबत स्टाफ दिसत आहे. सर्वांनी मास्क लावलेला आहे. फोटो सोबत तिनं लिहिलं की, अजून एक दिवस, आणखी एक शूट, माझा योद्धा, पुनी ला मिस करत आहे.
करीना अशा सेलिब्रिटीज पैकी एक आहे, ज्यांनी त्यांची प्रेग्नेंसी सिक्रेट ठेवली नाही. तैमूरच्या जन्माच्या काही दिवस आधीपर्यंत ती काम करत होती. त्याच्या जन्मानंतर तिने काही दिवसांचा ब्रेक घेतला होता पण पुन्हा तितक्याच उत्साहाने तिनं काम केलं.
39 वर्षीय करिना दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या वेळी देखील काहीशी पहिल्या सारखीच दिसत आहे. करीना अमीर खानचा सिनेमा ‘लाल चड्डा’ मध्ये दिसणार आहे. मीडियाच्या माहितीनुसार करीना प्रेग्नेंसी मध्ये देखील सिनेमाचं शूटिंग सुरु ठेवणार आहे. तिच्या बेबी बंपला व्हिएफएक्स च्या मदतीने नंतर एडिट करण्यात येणार आहे.
तैमूरच्या जन्मावेळी घेतलेल्या ब्रेकनंतर करिनाचा पहिला सिनेमा वीरे दी वेडिंग हा होता, जो 2018 मध्ये आला होता. हा सिनेमा खूप गाजला देखील होता. तैमूरच्या जन्माआधी करिनाने उडता पंजाब हा सिनेमा केला होता. त्यानंतर 2019 मध्ये करीना अक्षय कुमार सोबत गुड न्यूज मध्ये दिसली होती. त्याच वर्षी करीना इंग्रजी मिडीयम मध्ये दिसली होती जी इरफान खानची शेवटची फिल्म होती.