बहुजननामा ऑनलाइन टीम – दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकाने तरुणाला मारहाण करत(young man was beaten by a rickshaw) त्याचे दात पाडल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी तोहीब शेख (रा. लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुमीत शेळकंदे (वय २१, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत दुचाकीवरून मित्राचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी जात होता. धानोरी लोहगाव रस्त्यावर रिक्षचालक तोहीबने सुमीतच्या दुचाकीला कट मारल्याने तो खाली पडला. सुमीतने त्याचा जाब विचारत तुला रिक्षा नीट चालवता येत नाही का? अशी विचारणा तोहीबला केली. त्यामुळे राग आल्यामुळे तोहीबने रस्त्यात पडलेला दगड सुमीतला फेकून मारला. त्यामुळे सुमीतचे दोन दात पडले. अधिक तपास उपनिरीक्षक लहू सातपुते करत आहेत.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’
बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...
Read more