बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात(two-wheeler thief )आल्या आहेत.
सुलतान रिझवान शेख (रा. गांधीनगर येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शहरात घरफोड्या आणि वाहन चोऱ्या सुरूच आहेत. त्या काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. पण या चोरट्यांना पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खडक पोलिसांचे तपास पथक गस्त घालत असताना सराईत वाहनचोर भवानी पेठेत थांबला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमेय रसाळ व राहुल मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुलतानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खडक, लष्कर, कोंढवा, कोरेगाव पार्क परिसरातून ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक निरीक्षक सुशील बोबडे, अजीज बेग, गणेश सातपुते, अनिकेत बाबर, अमेय रसाळ, सागर केकाण, संदीप कांबळे, समीर माळवदकर, राहुल मोरे, रोहन खैरे, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.