नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने चीनच्या PUBG या मोबाईल गेमवर बॅन आणल्यानंतर याचा सर्वात मोठा झटका गेमची डेव्हलपर कंपनी Tancent चं मोठं नुकसान झालं आहे. एका रिपोर्टनुसार, चीनच्या या कंपनीला मार्केट व्हॅल्यूनुसार 34 अरब डॉलरचं नुकसान झालं आहे. टांसेन्टला झालेलं हे नुकसान भारताने PUBG सह 118 अँप्सवर बॅन आणल्यानंतर झालं आहे. भारत सरकारने PUBG सोबत areana of valor, Chess Run, Ludo World सारख्या मोबाईल अँप्सवर बंदी घातली. या अँप्सवर बंदी घातल्यानंतर कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.
भारतातून सर्वाधिक कमाई करत होती टांसेन्ट
टांसेन्ट PUBG गेम मधून भारतातून सर्वाधिक कमाई करत होती. रोज या गेमला जवळजवळ 3 कोटी ऍक्टिव्ह युजर्स मिळत होते. या गेमच्या ऍक्टिव्ह युजर्सच्या बाबतीत भारत टॉप वर होता. याच कारणामुळे टांसेन्ट भारतातून सर्वात जास्त कमाई करत होती.
अमेरिकेने नुकताच we chat बॅन केला
भारताने 118 अँप्स वर बंदी घातल्यानंतर टांसेन्ट कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. हाँगकाँग एक्सचेंजवर कंपनीच्या शेअर्सचा भाव 545 डॉलर वरून कमी होऊन 519 डॉलरवर आला आहे. कंपनीच्या आणखी एका अँपवर म्हणजे we chat वर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगत अमेरिकेने बंदी घातली आहे. त्यानंतर टांसेन्टचं खूप नुकसान झालं आहे.
अँप स्टोअर मधून हटवला PUBG
भारतात गुगल प्ले स्टोअर वरून PUBG मोबाईल अँप हटवण्यात आला आहे. पण अजूनही ज्या युजर्सच्या स्मार्टफोन मध्ये हा गेम आहे तेच युजर्स गेम वापरू शकतात.