बहुजननामा ऑनलाईन टीम : एखाद्या डॉक्टरचा मुलगा हा शक्यतो डॉक्टर तर पुढाऱ्याच्या मुलगा हा राजकारणातच उतरतो. मात्र देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुलगी सामान्य नागरिकांप्रमाणे प्रायव्हेट जॉब करत आहे. रामनाथ कोविंद यांची मुलगी स्वाती कोविंद ह्या इंडियन एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस आहेत. ती अमेरिका, फ्रान्स असा लांबचा पल्ला गाठत आपले काम चोखपणे करत असते. दरम्यान, रामनाथ कोविंद यांचा जन्म कानपूर जिल्ह्यातील परौंख या छोट्याशा गावी झाला.
कोविंद हे कोळी जातीचे आहेत, जे उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती, गुजरातमधील अनुसूचित जमाती आणि ओडिशामधील अनुसूचित जमातीचे आहेत. वकिली पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सराव सुरू केला. ते १९७७ ते १९७९ दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील होते.
८ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. तिसर्या प्रयत्नातच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र त्यांच्या मुलीने आपल्या वडिलांच्या नावावर कधीही मोठ्या नोकरीसाठी अर्ज केला नाही, ती आपल्या कामात खुश आहे. स्वाती यांच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील नेहमी सांगायचे की, एखाद्याने स्वतंत्र व्हावे. त्यामुळे स्वाती यांना इंडियन एअरलाइन्समध्ये नोकरी मिळविण्यात यश आलं आहे आणि तिला तिच्या नोकरीबद्दल फार समाधान वाटले आहे. वडिलांचे नाव घेऊन ती कधीही लाइम लाईट मध्ये आली नाही.
Visit : bahujannama.com