पुणे : ऑनलाइन टीम : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोन पोलिस 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर आणि विशाल मैद अशी अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
विशाल आणि ज्ञानेश्वर हे दोघेही शिर्डी पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्या भावाला आणि त्यांच्या नोकराला दाखल गुन्हयात अटक न करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितली. यातील तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी केली असता, त्यात लाच मागितल्याने निष्पन्न झाले. त्यानुसार 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. एलसीबीचे नाशिक परिक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्या पथकाने केली.
Visit : bahujannama.com