बहुजननामा ऑनलाईन टीम : पोलिसांनी नायजेरियातील लागोसमध्ये अशा ‘बेबी फॅक्टरी’चा खुलासा केला आहे जिथे महिलांना बांधून त्यांच्यावर बलात्कार केला जात होता आणि बलात्कारापासून जन्मलेली मुले विकली जात होती. मुलांची किंमत सुमारे ८७ हजार रुपये ठेवली गेली होती, तर मुलींची किंमत सुमारे ६० हजार रुपये लावली जात होती. बेबी फॅक्टरी म्हणून वापरल्या जाणाऱ्या लागोसमधील इमारतींवर पोलिसांनी सोमवारी छापा टाकला. अपहरण करून स्त्रियांना येथे आणले जात होते आणि नंतर त्यांचे शोषण केले जात होते.
मिळालेल्या माहितूनुसार पोलिसांनी प्रशिक्षण न घेता येथे काम करणाऱ्या दोन परिचारिकांना अटक केली आहे. पोलिसांनी कारखान्यातून १९ महिलांची सुटका केली, सर्व महिला गर्भवती होत्या. त्यांच्याबरोबर मुलांची सुटका देखील करण्यात आली. लागोस हे नायजेरियातील सर्वात मोठे शहर आहे.
बचावलेल्या महिलांचे वय १५ ते २८ वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस अद्याप मुख्य संशयिताचा शोध घेत आहेत, ज्याचे नाव मॅडम ओलूची असल्याचे समोर आले आहे. ओलूची ही ५ मुलांची आई आहे. येथे बंधक बनविलेल्या बर्याच महिलांना दुर्गम भागातून आणले जायचे आणि शहरात घरकाम करण्याचे आश्वासन त्यांना दिले जायचे. या महिलांना पैसे दिले गेले नाहीत. एका स्थानिक व्यक्तीने रस्त्यावर गर्भवती महिला मोठ्या संख्येने पाहिल्याची माहिती दिली तेव्हा पोलिसांना या कारखान्यांविषयी माहिती मिळाली.
Visit : bahujannama.com