Pravin Darekar | मराठा समाजाच्या प्रश्नावर आमचे सरकार सकारात्मक – आमदार प्रवीण दरेकर

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पुढाकारात स्थापन झालेले सरकार मराठा समाजासाठी अनुकूल आहे. मराठा समाजाच्या (Maratha Morcha) मागण्यांसाठी हे सरकार प्रयत्नशील आहे, असे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले आहेत. आमच्या सरकारची मानसिकता अत्यंत उत्तम असून, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सकारात्मक आहे, असे देखील दरेकर (Pravin Darekar) म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे देखील आमच्या सरकारमध्ये मराठा समाजाच्या बाजूने उभे आहेत, असे देखील दरेकर म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तसेच मराठा समाजातील तरुणांना उद्योजक म्हणून उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मी जातीने लक्ष देऊन मराठा समाजातील तरुण उद्योजकांसाठी ज्या काही भांडवल उपल्बध करुन देण्यात तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर केल्या आहेत, असे प्रवीण दरेकर ( Pravin Darekar) यावेळी म्हणाले.
यावेळी दरेकरांनी बोलताना शिवसेनेच्या नव्या चिन्हावर (Mashal Symbol) म्हणजे, मशालीवर देखील भाष्य केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाने त्यांच्या नव्या चिन्हाच्या प्रचारार्थ अनेक मोर्चे काढत मशाल हाती घेतली होती.
त्यावर दरेकर म्हणाले, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात ज्याप्रकारे काही तुरळक लोक मोर्चात होते,
त्यावरुन त्यांना जास्त प्रतिसाद मिळत आहे, असे मला वाटत नाही.
पक्षाचे चिन्ह जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक वर्षे खर्च करावी लागतात.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नव्या चिन्हाचे कौतुक असणे स्वाभाविक आहे, असे देखील दरेकर म्हणाले.
शिवसेनेला नवे निवडणूक चिन्ह मशाल मिळाले आहे.
त्यावर आता शिंदे यांच्या गटातील आणि भाजपमधील (BJP) आमदारांनी निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena of Balasaheb) हे नाव धारण केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pravin Darekar | Our government is positive on the issue of Maratha community – MLA Praveen Darekar
हे देखील वाचा :
Pune Crime | वाढदिवस ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस! लोखंडी रॉड डोक्यात पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Shivsena | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब कोण?, किशोरी पेडणेकरांचा सवाल
Comments are closed.