नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती सतत खालावत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रणव मुखर्जी गंभीर कोमात गेले आहेत आणि सतत व्हेंटिलेटर सपोर्टवरच आहेत. आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयाने वैद्यकीय बुलेटिन जारी करत म्हटले की, माजी राष्ट्रपती गेल्या १७ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत आणि मेंदूतील शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती गंभीर होत चालली आहे.
आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फुफ्फुसात संसर्ग झाला आहे, ज्याचा उपचार सुरू आहे. मंगळवारपासून त्यांच्या मूत्रपिंडाचीही प्रकृती ठीक नसल्याचे डॉक्टरांच्या टीमने सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची प्रकृती ‘हेमोडायनॅमिकली स्टेबल’ आहे. याचा अर्थ असा की, प्रणव मुखर्जी यांचे हृदय योग्यरित्या कार्य करत आहे आणि शरीरात रक्त पुरवठा देखील सामान्य आहे.
Former President Pranab Mukherjee (in file pic) is under intensive care and is being treated for lung infection and renal dysfunction. He continues to be in deep coma and on ventilator support. He is haemodynamically stable: Army Hospital (R&R), Delhi Cantonment pic.twitter.com/oGpK0OAn9A
— ANI (@ANI) August 28, 2020
गेल्या आठवड्यात प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याची तक्रार होती, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली. तज्ञ डॉक्टरांची टीम सतत त्यांचे निरीक्षण करत आहे. प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजीच दुपारी एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचणी दरम्यान ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते, तेव्हापासूनच त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.