सत्तेची स्वप्न पाहत असाल तर त्यासाठी बेलगाम घोड्याची लगाम हातात घेण्यासाठी धोरण ठरवा. आरएसएस हा बेलगाम घोडा असून त्याला लगाम घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. काँग्रेस त्यासाठी तयार नाही. काँग्रेसने आरएसएस बाबत धोरण मांडले तर आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहोत,’ असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाही धारेवर धरलं आहे.
‘देशात दोन सरकार चालत आहेत. एक संविधानाप्रमाणे तर दुसरं मोहन भागवत यांच्या सांगण्याप्रमाणे. जर दुसऱ्यांदा देशात त्यांचे सरकार आले तर समजा हिटलरचे सरकार येईल,’ असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेससोबत आघाडीची बोलणी न झाल्याने आता प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार घोषीत करण्यास सुरुवात केली आहे. धुळे-मालेगाव लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडी तर्फे कासमी कमाल हासमी यांची उमेदवारी देखील प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, मालेगावातील या सभेत लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र येथे ही एमआयएमचे असुद्दीन ओवेसी यांच्यासोबत एमआयएमचा कोणीही मोठा नेता उपस्थित नव्हता.