नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून वस्तुतः पोस्टल विभागाने मॅग्नेटिक एटीएम कार्डऐवजी आपल्या बचत खाते असणाऱ्यांना ईव्हीएम चिप एटीएम कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही मॅग्नेटिक कार्ड वापरत असाल तर आजच एक नवीन कार्ड घ्या. कारण उद्यापासून तुमचे जुने कार्ड वापरू शकणार नाहीत. ईव्हीएम चिप असलेले कार्ड मॅग्नेटिक कार्डपेक्षा जास्त सुरक्षित असून मॅग्नेटिक कार्ड १ फेब्रुवारी पासून बंद केले जाणार आहे. खातेदार होम ब्रांचला जाऊन मॅग्नेटिक एटीएम कार्ड बदलू शकतात.
पोस्ट ऑफिसने एक अधिसूचना केली असून पोस्ट ऑफिस सेविंग्स बँक ग्राहकांना ३१ जानेवारी २०२० पर्यंत त्यांच्या होम शाखेतून मॅग्नेटिक एटीएम कार्ड अधिक सुरक्षित ईव्हीएम चिपसह बदलण्याची विनंती केली गेली आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबरही अपडेट करू शकता.
काय आहे ईएमव्ही चिप कार्ड ?
चिप आधारित कार्ड, मॅग्नेटिक स्ट्रीप कार्डपेक्षा अधिक सुरक्षित डेटा आणि एन्क्रिप्शन आणि स्टोरेज तंत्रज्ञानाचे कार्य करतात. मॅग्नेटिक कार्डमध्ये पेमेंट करण्यासाठी आपल्याला एकदाच स्वाइप करावे लागत होते. तर आता नवीन ईव्हीएम कार्डद्वारे पैसे भरण्यासाठी आपल्याला पिन टाकावा लागणार असून त्यामुळेच हे नवीन कार्ड अधिक सुरक्षित आहे.