नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा ३९ वर्षीय माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया हा सोशल मीडियावर सक्रिय असून परत एकदा चर्चेत आला आहे. ट्विटरवर #AskDanish असे सत्र चालू असताना एका महिला चाहतीने दानिशला इस्लाम धर्म स्वीकारण्याचे आवाहन करत इस्लामशिवाय जीवन काहीच नसल्याचेही म्हटले आहे. पण दानिशने तिच्या या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी जास्त वेळ ना घालवता बऱ्याच जणांनीही तुमच्याप्रमाणे हा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश आले नाही.
दानिशची चाहती आमना गुल या यूजरने ‘तुम्ही इस्लाम स्वीकारला पाहिजे. इस्लाम सर्वकाही आहे. मला माहित आहे की, इस्लामशिवाय जीवन काहीच नाही. तुमचे जीवन मृत्यूसारखे आहे. तुम्ही इस्लामचा स्वीकार करा,’ असे लिहिले. त्यावर दानिशने लगेच उत्तर देत ‘तुच्यासारख्या बऱ्याच लोकांनी माझा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. पण यशस्वी झाले नाही,’ असे लिहिले. इथेच न थांबता त्याने ‘हिंदू असण्यावर गर्व आहे,’ असेही उत्तर त्या युजरला दिले.
Many people like you tried to change my religion, but did not succeed. https://t.co/p260TxmFUL
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 30, 2020
त्या युजरने परत एकदा प्रश्न उपस्थित करत तुम्हाला पाकिस्तानात सुरक्षित वाटत नाही का ? असा प्रश्न केला. त्यावर दानिशने ‘मी इथे पूर्णपणे सुरक्षित आहे. मी सांगितले होते की, काही लोकांनी प्रयत्न केला होता. शब्दांसह खेळू नका,’ असे उत्तर दिले.
I am feeling very safe. I said some people tried. Don’t play with words. https://t.co/Npngt5NUB3
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 30, 2020