• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

CMO च्या ट्विटवरून राजकारण तापलं, काँग्रेसनंतर आता उपमुख्यमंत्री पवारांनी देखील स्पष्टच सांगितलं

by sheetal
January 7, 2021
in राजकारण
0
Deputy Chief Minister Ajit Pawar

Deputy Chief Minister Ajit Pawar

बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून राज्यात राजकारण ( Chief Minister Pawar)चांगलच रंगु लागलं आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले आहेत, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या वैद्यकीय खात्याच्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील एक निर्णय घेण्यात आला, हा निर्णय CMO च्या अधिकृत ट्विटर याची माहिती देताना संभाजीनगर (औरंगाबाद) असा उल्लेख करत पोस्ट करण्यात आली. त्या पोस्टवरून  राजकारण चांगलंच तापलं आहे.

CMO च्या ट्विटवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात चांगलेच संतापले. म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असं स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे आधीच जाहीर आहे. मात्र असं असतानाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असं केल्याने महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ३ ट्विट करत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

तर या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे, अजितदादा म्हणाले की, बुधवारी रात्रीपासून या विषयावर बातम्या ऐकायला मिळत आहेत, मला याबाबत काहीच माहिती नाही, सकाळपासून मी जनता दरबार घेत आहे, त्यामुळे आता मंत्रालयात गेल्यावर संबंधित पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बसून चर्चा करू, आम्ही समान किमान कार्यक्रम घेऊन सरकार चालवत आहोत, त्यामुळे एकत्र बसून यावर निर्णय घेऊ असं नामांतरणाच्या वादावर अधिकचं भाष्य करणं टाळलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी भावनिक मुद्दे काढतं तर कोणी विकासाच्या मुद्द्यावर बोलतं, गेल्या ६० वर्षापासून महाराष्ट्रात हेच सुरू आहे, आज औरंगाबादबद्दल बोललं जातंय, उद्या पुणे, अहमदनगर, नाशिक वैगेरे अनेक शहरांबाबत बोललं जाईल, त्यामुळे मागणी करण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही, लोकशाही पद्धतीत निवडून आलेले सत्ताधारी बहुमताच्या जोरावर शहरांची नावं बदलतात हे मायावतींनी केलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे विकासाला आम्ही महत्त्व दिलं आहे. तीच भूमिका घेऊन सरकार पुढे चाललं आहे असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

यावर  भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, काँग्रेसने असे ‘ठणकाऊन’ सांगितल्यावर आता शिवसेना काय म्हणणार? विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेला सांगण्यासारख काहीच नाही म्हणून भावनिक मुद्दे. आता नामांतराचा प्रस्ताव थेट कॅबिनेटमध्ये आणून उत्तर देणार? का ठणकावलं की सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी सत्ताधारी शिवसेनेला विचारला आहे.

Tags: CMO's tweetCongressnow Deputy Chief Minister Pawarउपमुख्यमंत्री पवारराजकारण
Previous Post

Pune News : आर्थिक व्यवहारामुळे फ्लेक्सवरील कारवाईला ‘ब्रेक’; तक्रार करणारांना धमकी, पालिकेतील अतिक्रमण विभागाचा प्रताप

Next Post

आ. रोहित पवारांकडून PM मोदींच्या ‘या’ निर्णयाच स्वागत, केली ‘ही’ विनंती

Next Post
MLA Rohit Pawar

आ. रोहित पवारांकडून PM मोदींच्या ‘या’ निर्णयाच स्वागत, केली 'ही' विनंती

Please login to join discussion
Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Deputy Chief Minister Ajit Pawar
राजकारण

CMO च्या ट्विटवरून राजकारण तापलं, काँग्रेसनंतर आता उपमुख्यमंत्री पवारांनी देखील स्पष्टच सांगितलं

January 7, 2021
0

...

Read more

27 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थिनीसोबत प्राध्यापकाचं ‘रिलेशन’, यूट्यूबवर व्हिडिओ पाहून प्रभावित झाली होती ‘विद्यार्थिनी’

6 days ago

Corona Vaccine : देशातील ‘या’ मोठ्या कंपन्या करणार कर्मचाऱ्यांचे लसीकरण, लस खरेदीची चर्चा सुरू

1 day ago

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

4 hours ago

Bhosari News : VIP SPA सेंटरमध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

7 hours ago

Kolhapur News : रेशन कार्डास आधार लिंक न झाल्यास धान्य बंद – जिल्हाधिकारी

5 days ago

Pune News : अखेर ‘जम्बो कोविड’ सेंटर ‘शटडाऊन’

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat