गाजीपूर बहुजननामा : सेक्स रॅकेटच्या घटना दिवसेंदिवत वाढत चालल्या आहेत. चार भिंतींच्या आत चालणार हा व्यवसाय आता खुलेआम सुरु आहे. उत्तरप्रदेश मधील गाझीपूर येथे अशीच एक घटना समोर आली आहे. पोलिसांची भीती आणि पकडू नये म्हणून चक्क हायवे वर चालत्या गाडीत सेक्स रॅकेटचा व्यवसाय सुरु आहे. जेणेकरून पोलिसांच्या नजरेत धूळ फेकता येई.
वाराणसी मधून कॉल गर्ल आणि तीन लोक घेऊन चाललेल्या लग्झरी कारमध्ये हा विचित्र व्यवसाय सुरु होता. पोलिसांनी अडवून देखील ते थांबत नसल्याने पोलिसांनी गाडीला घेरा घातला. अशा प्रकारे या प्रकरणाचा छडा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गाजीपूर मार्गे मऊ दिशेने हि कार हळू वेगाने चालली होती आणि विचित्र पद्धतीने हलताना जाणवली . पोलिसांना शंका येताच त्यांनी ती गाडी थांबवण्यास सांगितली, परंतु गाडी न थांबता मऊ च्या दिशेने जाऊ लागली. पोलिसांनी लगेच पुढील पोलीस स्टेशन ला हि बातमी कळवली. गाडी पकडताच त्यात एक कॉल गर्ल आणि तीन जण विचित्र परिस्थिती आढळून आले.
गाडी मध्ये दारू च्या बाटल्या आढळून आल्या. सध्या चारही आरोपी पोलिसांच्या कस्टडीत आहेत. गाजीपूर सोबतच आसपास च्या परिसरात असे प्रकार घडत असतील अशी शंका देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.