अमृतसर : वृत्तसंस्था – एक अशी बातमी समोर आली आहे की, ३ महिन्यांपूर्वी विवाहित तरुणाच्या जीवनात एका अल्ट्रासाऊंड रिपोर्टने भूकंप आणला आहे. या घटनेमुळे त्या तरुणाने लग्नाबाबतचे पाहिलेले स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. समोर आलेली घटना वाचल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल एवढे मात्र नक्की. अशी घटना तुम्ही याआधीही कदाचित वाचली असेल. संदीप असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत एका अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये संदीपच्या पत्नीला ४ महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले आहे. यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमिनीच सरकली आहे.
समोर आलेल्या माहितीनसुार, संदीप हा गुज्जरपूराच रहिवासी आहे. संदीपचा असा आरोप आहे की, त्याची पत्नी आधीपासूनच त्याच्यासोबत भांडण करत होती आणि सुसाईड करण्याच्या धमक्याही देत होती. एकदा संदीपच्या पत्नीची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं. यात तपासणीनंतर असं समजलं की, ती ४ महिन्यांची गरोदर आहे. संदीप आणि त्याच्या पत्नीच्या लग्नाला मात्र तीनच महिने झाले होते.
याबाबत पोलिसांनी मात्र हे कौटुंबिक भांडण असल्याचे सांगत दोन्ही गटांना बोलावून हे प्रकरण सोडवण्यासाठी सांगितले आहे. याबाबत त्या मुलीचे कुटुंबीयदेखील काही बोलण्यास तयार नाहीत. परंतु संदीपच्या वैवाहिक जीवनाला मात्र ग्रहण लागले आहे.