बारामती : बहुजननामा ऑनलाइन – Police Inspector Transfer | बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण (Police Inspector Mahesh Dhawan) यांची पोलीस मुख्यालयात (Headquarters) तडकाफडकी बदली (Police Inspector Transfer) करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी दिले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे 24 सप्टेंबरपासून अर्जित रजेवर आहेत. तेव्हापासुन त्यांचा पदभार पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. सध्या ढवाण यांच्या बदलीनंतर तालुका पोलीस ठाण्याचा (Taluka Police Station) तात्पुरता पदभार आता पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. पोलीस निरीक्षक मोरे हे पुणे ग्रामीण डायल 112 चे पोलीस निरीक्षक आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, 4 ऑक्टोबरला जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक झाली.
त्यात ढवाण यांची नियंत्रण कक्षात बदली (Police Inspector Transfer) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ढवाण यांनी बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत हजर होवून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
महेश ढवाण यांच्याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती.
त्याची गांभीर्याने दखल घेत त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
Web Title :- Police Inspector Transfer | police inspector mahesh dhawan has been transferred to police headquarters
हे देखील वाचा :
Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता
Kolhapur Wrestler Died | धक्कादायक! कोल्हापुरमध्ये पैलवानाचा सरावादरम्यान मृत्यू