PM Narendra Modi On Fuel Price | महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं…

PM Narendra Modi On Fuel Price | why not reduction in petrol and diesel prices in the states narendra modi asks chief ministers meeting on corona

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Narendra Modi On Fuel Price | कोरोनाच्या (Corona) वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (बुधवारी) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. बैठकी दरम्यान बोलताना लहान मुलांना कोरोना लस (Corona Vaccination) उपलब्ध झाली असून राज्यांनी आता लसीकरणावर लक्ष केद्रीत करावे, असा आदेश मोदींनी दिला. त्यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या इंधन किंमतीच्या (Fuel Price) पार्श्वभूमीवर राज्यांना सुनावले. (PM Narendra Modi On Fuel Price)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”विरोधी पक्षांनी ज्या राज्यात सत्ता आहे त्यांनी आपल्या राज्यातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel Price) कमी झालेल्या किंमतीचा लाभ दिलेला नाही. या राज्यांनी इंधनाच्या किमतीत कपात केली नाही. व्हॅट (VAT) कमी न करता या राज्यांनी केवळ लाभ मिळवला आहे. जागतिक संकटाच्यावेळी राज्यांनी आणि केंद्राने एकत्र येऊन पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. तसेच मोदींनी ज्या राज्यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केला नाही त्यांची महाराष्ट्रासह (Maharashtra State Government) संबधित राज्यांची नावे घेतली आहेत.

 

दरम्यान, दिवाळीच्या कालावधीत केंद्राने इंधनाच्या दरात 5 रुपयांनी घट केली होती.
त्यानंतर भाजप (BJP) शासित राज्यानेही इंधनाचे दर कमी करुन एक दिलासा दिला होता.
ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे तेथे इंधनाचे दर इतर राज्यापेक्षा कमी आहे.
परंतु, महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कपात केली नव्हती. केंद्राने जेवढा दर कपात केला होता,
तेवढाच तो दिलासा मिळाला. याच मुद्याला अनुसरुन पंतप्रधान मोदींनी संबधित राज्यांना सुनावले आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- PM Narendra Modi On Fuel Price | why not reduction in petrol and diesel prices in the states narendra modi asks chief ministers meeting on corona

 

हे देखील वाचा :

Pune MHADA | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा तब्बल 1200 सदनिकांची सोडत काढणार

PMC Cut Illegal Water Connections | अतिक्रमण कारवाईनंतर पाणी पुरवठा विभागाचा झटका ! डी.पी. रस्त्यावरील हॉटेल्स, मंगल कार्यालयातील 15 बेकायदा नळ कनेक्शन महापालिकेने तोडली

कामाची बातमी ! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? UIDAI ने सांगितली ओळखण्याची सोपी पद्धत