नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस महामारीने एक वर्षापेक्षा जास्त काळ कहर चालवला आहे. यामुळे मोठ्या कालावधीपासून शाळा School सुद्धा बंद आहेत. या संकटाच्या काळात लोक त्रस्त असताना, अनेक मुले मात्र खुश आहेत. कारण त्यांच्या परीक्षा सतत रद्द केल्या जात आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये दोन खुपच क्यूट मुले ’बलिदान’ देण्यास तयार असल्याचे म्हणत आहेत. इंटरनेटवर हा व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे. 15 सेकंदाच्या या व्हिडिओत दोन छोटी मुले दिसत आहेत. एकाने काळ्या रंगाचा टी- शर्ट घातला आहे तर दुसर्याने पिवळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला काळ्या टी-शर्टमधील मुलगा म्हणतो, जर कोरोनाशी लढण्यासाठी आमच्या शिक्षणाचा बळी द्यावा लागला तरी मोदीजी आम्ही तयार आहोत. यानंतर, पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला दुसरा मुलगा सुद्धा म्हणतो, सात वर्ष जरी शाळा School बंद कराव्या लागल्या तरी हे बलिदान आम्ही देऊ.
पिवळ्या शर्टवाल्या मुलाच्या भोळेपणावर लोक फिदा
व्हिडिओच्या शेवटी पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या मुलाच्या भाबडेपणावर लोक खुपच खुश झाले आहेत. लोकांना त्याने म्हटलेले हे बलिदान आम्ही देऊ हे वाक्य आणि हावभाव खुपच पसंत पडत आहेत. मात्र, अजूनपर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की व्हिडिओत दिसणार्या मुलांची नावे काय आहेत आणि ती कुठे राहणारी आहेत. इतकेच नव्हे तर व्हिडिओ कुठे आणि कधी शूट केला आहे हे सुद्धा समजलेले नाही. परंतु व्हिडिओ मागील एक-दोन दिवसांपासून वेगाने सोशल मीडियावर वायरल होत आहे. वरिष्ठ टीव्ही पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेयर केला आहे. त्यांनी लिहिले, कोरोनाशी आपण युद्ध आवश्य जिंकू. प्रत्येक मुल बलिदान देण्यासाठी तयार आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी रात्रीपर्यंत 90 हजार वेळा पाहिला गेला होता.
कृपया हे देखील वाचा:
…म्हणून मध्यरात्री फेसबुक लाईव्ह करत व्यापाऱ्याने हाताची नस कापली
SBI, HDFC, ICICI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, जून महिन्याअखेर बंद होणार ‘ही’ सुविधा
कळंबमध्ये वॉचमनचा गोळ्या झाडून खून, परिसरात प्रचंड खळबळ
औरंगाबादमध्ये कुख्यात गुंडाची साडूकडूनच ‘गेम’, मित्राच्या मदतीनं केला खेळ ‘खल्लास’