नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ च्या धर्तीवर ‘वन नेशन वन हेल्थ कार्ड’ आणण्याची तयारी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा करू शकते. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचा आरोग्याचा डेटा एकाच व्यासपीठावर असेल. या व्यतिरिक्त प्रत्येकाचे हेल्थ आयडी कार्ड तयार केले जाईल. या डेटामध्ये डॉक्टरांच्या तपशीलासह आरोग्य सेवांविषयीची माहिती देशभर उपलब्ध असेल. यासाठी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून तत्वत: मान्यता मिळाली असल्याचे समजते. या आठवड्याच्या अखेरीस या अभियानास अधिकृत मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे. 15 ऑगस्टला पंतप्रधान आपल्या घोषणेसह हे लॉन्च करण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या काय आहे ‘वन नेशन वन हेल्थ कार्ड’ –
सरकारच्या वन नेशन वन हेल्थ कार्ड योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला आरोग्य कार्ड बनवून घ्यावे लागेल. यातून होणाऱ्या उपचार आणि चाचणीची संपूर्ण माहिती या कार्डमध्ये डिजिटलपणे जतन केली जाईल. याची नोंद ठेवली जाईल. याचा सर्वात मोठा फायदा असा असेल की, जेव्हा आपण देशातील कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे उपचारासाठी जाता, तेव्हा तुम्हाला सर्व रिसिप्ट व चाचणी रिपोर्ट घेऊन जाण्याची आवश्यकता नसेल. डॉक्टर कोठूनही आपल्या युनिक आयडीद्वारे सर्व वैद्यकीय नोंदी पाहू शकतील.
अश्या पद्धतीने काम करेल हेल्थ कार्ड :
एखाद्या व्यक्तीचा मेडिकल डेटा ठेवण्यासाठी रुग्णालये, दवाखाने, डॉक्टरांना सेंट्रल सर्व्हरशी जोडले जाईल. रुग्णालय आणि नागरिकांसाठी आता त्यांना या मोहिमेमध्ये सामील व्हायचे आहे की नाही या आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. प्रत्येक नागरिकासाठी एक अनोखा आयडी जारी केला जाईल. लॉगिन त्याच तत्त्वावर केले जाईल. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान मुख्यतः चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. हेल्थ आयडी, वैयक्तिक आरोग्याची नोंदी, देशभरातील डिजी डॉक्टर आणि आरोग्य सुविधांची नोंदणी.
470 कोटी रुपयांची मंजुरी
अहवालानुसार ही योजना देशातील निवडक राज्यांमध्ये प्रथम सुरू केली जाईल आणि त्यानंतर ती वेगवेगळ्या टप्प्यात देशभर राबविली जाईल. यासाठी अर्थ मंत्रालयाने 470 कोटी रुपये मंजूरही केले आहेत. या योजनेत, आरोग्य आयडी धारकांच्या डेटाच्या गोपनीयतेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. त्यांच्या परवानगीशिवाय दुसर्या कोणालाही त्यांची माहिती मिळणार नाही. लोक आधार कार्डमध्ये हा अनोखा हेल्थ आयडी देखील जोडू शकतात, यासाठीही पर्याय खुला राहील.