नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात लवकरच पुढील हप्त्याचे पैसे येणार आहेत. जर शेतकरी दहाव्या हत्प्याची (10th installment) प्रतीक्षा करत असतील तर 15 डिसेंबरला 10 व्या हप्त्याचे 2,000 रुपये अकाऊंटमध्ये येतील. याचा अर्थ असा की, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत रजिस्टर्ड शेतकर्यांच्या खात्यात सरकार दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये पाठवेल.
तसेच, केंद्र सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan) पैसे ट्रान्सफर केले होते. आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत.
या शेतकर्यांना मिळतील 4000 रुपये
ज्या शेतकर्यांना अजूनपर्यंत 9व्या हत्प्याचा लाभ मिळालेल नसेल त्या लोकांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकाचवेळी येतील म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. परंतु, ही सुविधा त्या शेतकर्यांनाच मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तुम्हाला पैसे मिळतील किंवा नाही चेक करा
जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan) रजिस्ट्रेशन केले असेल तर हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.
यादीत असे चेक करा नाव
- सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
- होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
- Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
- नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
- यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.
अशाप्रकारे चेक करा स्टेटस
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा.
जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका.
तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा.
आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.
Web Title : PM Kisan | pm kisan beneficiaries get 4000 rupees 10th installment will credited soon check status.
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 37 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी