पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेत (Traffic Branch) कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाई महिलेने (dadies police) एका तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. या(Pimpri ) तरुणाकडून घेतलेले पैसे परत देण्याच्या बहाण्यान बोलावून घेत पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईच्या मदतीने तरुणाचे अपहरण (Kidnap) केले. त्याला(Pimpri ) इंदापूर जवळील जंगलात नेऊन मारहाण करत त्याच्याकडे दहा लाख रुपये अथवा किडनीची (Kidney) खंडणी (Ransom) मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 5 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा दहा ते तीनच्या दरम्यान घडला.
याप्रकरणी महिला पोलीस शिपाई मनिषा साळवे, शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई विजय कुमार साळवे, नंदकुमार कांबळे, अक्की लोंढे, सनी लोंढे, विनय लोंढे, मनिषा साळवे यांची आई (संपूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात खंडणी, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज असगर चौधरी (वय-21 रा. त्रिवेणीनगर, ओटा स्किम, निगडी ) याने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे ही पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. तर आरोपी विजय साळवे हा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे नेमणुकीस आहे. आरोपी मनीषा हिचे आणि फिर्यादी सूरजचे अनैतिक संबंध होते. मनीषा हिने सूरजकडून काही रक्कम घेतली होती. ते पैसे परत देण्याच्या बहाण्याने सुरजला थेरगाव येथील रॉयल कोर्ट सोसायटी समोर बोलावून घेतले.
याठिकाणी आरोपींनी सुरजला जबरदस्तीने गाडीत बसवून इंदापूरजवळ असलेल्या जंगलात नेले.
त्याठिकाणी आरोपींनी सूरजला लाकडी दांडक्याने, कोयत्याने मारहाण केली. तसेच सूरजचा मोबाईल घेऊन मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याच्या उद्देशाने फोडून फेकून दिला.
आरोपींनी सूरजकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. दहा लाख रुपये दे अथवा तुझी किडनी दे, अशी मागणी करीत धमकी दिली. या प्रकरणी आठवड्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार तपास करीत आहेत.