पिंपरी :बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Rape Case |पुण्यातील बलात्काराची घटना (Pune) ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये बलात्काराची (Pimpri Rape Case) घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi police station) हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने एका 38 वर्षाच्या शिक्षिकेवर एका नराधमाने बलात्कार (Pimpri Rape Case) केला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अवस्ती नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपीने महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून शाळेत आणि घरच्यांना दाखवून पुन्हा बलात्कार केला. मी निवृत्त एसीपी (Retired ACP)आहे, माझं कोणी काही करु शकत नाही. ही बाब कोणाला सांगितल्यास घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विकास अवस्ती Vikas Avasti (रा. पिंपळे गुरव) असं आरोपीचे नाव असून त्याने तो एसीपी असल्याची बतावणी केली. प्रत्यक्षात मात्र तो एसीपी नसल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली. या प्रकरणी अवस्ती सध्या फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी 38 वर्षीय शिक्षिकेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार डिसेंबर 2019 ते 8 ऑगस्ट 2021 या कलावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शिक्षिका असून त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली होती.
आरोपीने दरमहा दहा टक्के व्याजाने पैसे (Interest Money) देतो सांगत पीडित महिलेला घरी बोलावले. दोन कोऱ्या चेकवर आणि कागदावर सह्या घेतल्या.
पीडितेला सॉफ्ट ड्रिंक प्यायला देऊन तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर पीडित महिलेचे विवस्त्र फोटो काढून मिहिलेला पैसे न देता परत पाठवले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या घटनेमुळे पीडित शिक्षक खूप घाबरली होती.
पीडित महिला कार्यरत असलेल्या शाळेत आरोपी अवस्ती गेला.
त्याठिकाणी पीडित महिलेला विवस्त्र अवस्थेतील फोटो दाखवले व शाळेत आणि घरच्या व्यक्तींना फोटो दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.
दरम्यान, पीडित महिलेला दुचाकीवरुन घरी नेले.
बदनामी होईल या भीतीने महिला त्याच्या दुचाकीवर बसली.
आरोपी तिला घरी घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.
आरडाओरडा केलास तर मारुन टाकेन अशी धमकी त्याने दिली.
तू जर हे घरी सांगितलंस तर तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही.
‘मी निवृत्त एसीपी आहे, कोणी ही माझे काही करु शकत नाही’.
असं देखील आरोपी अवस्ती म्हणाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
अवस्तीच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाणे गाठत अवस्ती विरोधात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस महिला उपनिरीक्षक कविता रुपनर (PSI Kavita Rupanar) करीत आहेत.
Web Title : Pimpri Rape Case | rape case registered in sangavi pune accuse faking that he is retired police officer.
EPFO Alert | पीएफ खातेधारकांनी व्हावे सावध! ‘या’ गोष्टीकडे दिले नाही लक्ष तर गमवावी लागेल सर्व रक्कम