बहुजननामा ऑनलाइन टीम – विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक (carrying pistols)केली आहे. देहुरोड पोलिसांनी पालगन बाळगणाऱ्या तरुणाला अटक करुन दोन पालघन जप्त केले आहे. तर दुसरी कारवाई सांगवी पोलिसांनी केली असून एका तरुणाकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि.6) गुन्हा दाखला करण्यात आला आहे.
देहुरोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रणित काशीनाथ खटके (वय-19 रा. आदर्शनगर, देहुरोड) याला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.5) रात्री दहाच्या सुमारास आदर्शनगर येथे केली. त्याच्याकडून दोन पालगन जप्त करण्यात आले आहे. आरोपी विना परवाना पालगन जवळ बळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने लपवून ठेवलेले आणखी एक पालगन पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वासीम महम्मद शेख यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुभम महादेव खडसे (वय-22 रा. नखाले गुलमोहर कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे गावठी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी शुभम खडसे याला अटक करून त्याच्याकडून 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपळे सौदागर स्मशानभुमी जवळ बुधवारी (दि.6) रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस नाईक दिपक गुणवंत पिसे यांनी फिर्याद दिली आहे.