पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन – Pimpri News | बाळावर आयसीयु (ICU) मध्ये उपचार सुरु असताना डॉक्टर व त्याचे नातेवाईक हॉंस्पिटलमध्ये येऊन त्यांनी आयसीयु (ICU) ला ऑक्सिजन पुरवठा करणार्या पाईपचा कॉक बंद करुन बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन डॉक्टरांसह पुतण्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
डॉ. रमेश सोनवणे, त्यांचा मुलगा व डॉ. भूषण सोनवणे(Dr. Bhushan Sonawane) व त्यांचा पुतण्या हर्षल सोनावणे(Harshal Sonawane) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना सोमाटणे फाटा(Somatane fata) येथील जीवन हॉस्पिटल (Jeevan Hospital)मध्ये २२ जून २०२१ रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला होता.
याप्रकरणी दत्तात्रय एकनाथ वावरे(Dattatraya Eknath Wavre) (वय २८, रा. नायगाव, पो. कामशेत, ता. मावळ) या शेतकर्याने फिर्याद दिली आहे. दत्तात्रय वावरे यांच्या बाळावर जीवन हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने बाळाला आयसीयुमध्ये उपचार करण्यात येत होते. दत्तात्रय वावरे व त्यांच्या पत्नी वॉर्डाच्या बाहेर बाकड्यावर बसले होते.
रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डॉ. रमेश सोनवणे, त्यांचा मुलगा डॉ. भूषण सोनवणे, पुतण्या हर्षल सोनवणे हे आले.
त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन दमदाटी केली.
त्यांच्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती असतानाही त्यांनी आयसीयु वॉर्डला ऑक्सिजन पुरवठा करणार्या पाईपचा कॉक बंद करुन बाळाच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला.
web title: Pimpri News | Shocking! Attempt to kill baby in ICU by turning off oxygen cock, FIR against three including doctor father-son
FYJC | राज्यात 10 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत, 11 वी प्रवेशासाठी CET ची घोषणा