• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात गाडी चालवताना फोन बोलणाऱ्या 19 हजार जणांवर कारवाई

by sajda
January 13, 2021
in पुणे
0
Pimpri

Pimpri

बहुजननामा ऑनलाइन टीम –  रस्ते सुरक्षा हा सध्या सगळीकडे ऐरणीवरचा विषय झाला आहे. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे ही आता वाहनचालकांची सवय झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाडी चालवताना फोनवर बोलण्यामुळे झालेल्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास मनाई असताना देखील काही महाभाग याकडे दुर्लक्ष करीत असतात. अशा 19 हजार 765 वाहन चालकांवर वर्षभरात पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोबाइलवर बोलणाऱ्या 19 हजार 765 जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 39 लाख 52 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर 2019 मध्ये पोलिसांनी 56 हजार 797 जणांवर कारवाई करुन त्यांना 1 कोटी 23 लाख 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकाला 200 रुपये दंड केला जातो. ही कारवाई केवळ पोलिसांनी केलेली आहे. यापेक्षा कित्येकपटीने वाहनचालक बिनधास्तपणे वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना शहरात अनेक ठिकाणी दिसतात.

मोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर सहाजिकच मोबाइलवर बोलण्याकडे चालकाचे अधिक लक्ष जाते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होतात. दुचाकी चालविताना मान वाकडी करुन खांदा आणि मानेमध्ये मोबाईल पकडून बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असतात. जीवापेक्षा कोणाचाही फोन इतका महत्त्वाचा कधीच नसतो. पण बहुतांश चालकांना याची जाणीव नसल्याचे दिसून येते. परिणामी स्वत: चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात.

वाहनचलकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वत:सह इतर वाहनचालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. मोबाइलवर बोलत असताना दुचाकी चालक अचानक ब्रेक दाबणे, इंडीकेटर न लावता अचानक वळण घेणे, गतीरोधकावर वेग कमी न करणे, सिग्नल तोडणे असे प्रकार होतात. परिणामी अपघात होतात. याला आळा बसणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांकडून कारवाई वाढवण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.

Tags: Phonepimpri-chinchwadगाडीपिंपरी-चिंचवड
Previous Post

… तर धनंजय मुंडेंना शिक्षा व्हावी, भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक

Next Post

Gold Price Today : 2 दिवसाच्या तेजीनंतर घसरले सोने, चांदीत किंचित तेजी, पहा नवे दर

Next Post
Gold Price

Gold Price Today : 2 दिवसाच्या तेजीनंतर घसरले सोने, चांदीत किंचित तेजी, पहा नवे दर

Recruitment in Mahametro
नोकरी विषयक

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या १३९ जागांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र आता  ज्या उमेदवारांना या पदांसाठी...

Read more
Chhota Rajan

छोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं

January 28, 2021
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
Urban Bank fraud

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

January 28, 2021
Urban Bank fraud

Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

January 28, 2021
robbery in Market Yard

Pune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक

January 28, 2021
robbery in Market Yard

Pune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला

January 28, 2021
Pragya Jaiswal

‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ? ‘अंतिम’ सिनेमात करणार काम

January 28, 2021
Fatty Liver Symptoms

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

आशिष शेलार हे शरद पवार आणि संजय राऊतांवर संतापले, म्हणाले – ‘तुमची तोंडं का शिवली आहेत ?’

1 day ago

राष्ट्राध्यक्षपदाची बायडेन यांनी शपथ घेताच चीनने ट्रम्प यांच्या टीमवर लादले प्रतिबंध

7 days ago

Video : लंच डेटसाठी वेगवेगळ्या कारमधून आले ‘सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी’ ! व्हिडीओ व्हायरल

3 days ago

देशभरात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना दिली गेली कोरोना व्हॅक्सीन, आरोग्य मंत्री म्हणाले – : पूर्णपणे प्रभावी आणि सुरक्षित’

6 days ago

रोहित पवारांकडून शेतकर्‍यांना भडकावण्याचा प्रयत्न, भाजप नेते नीलेश राणेंची टीका

3 days ago

LAC वरील ‘तणाव’ कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात 15 तास चालली 9 व्या फेरीतील चर्चा

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat