पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – (Pimpri Crime) पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) भरदिवसा एका व्यक्तीचा कोयत्याने सपासप वार करुन डोक्यात दगड मारून निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या भरवस्तीजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना चिखली (Chikhali) परिसरातील मोरे वस्ती येथे आज (रविवार) दुपारी घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कानिफनाथ क्षीरसागर Kanifnath Kshirsagar (रा. पिंपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्यातील (Chikhali police station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पावठण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानिफनाथ हे एका लहान मुलासोबत आज सकाळी चिखली येथे आले
होते. चिखली येथील मोरेवस्तीजवळ हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोराने
कानिफनाथ यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये
गंभीर जखमी होऊन कानिफनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. दाट लोकवस्तीच्या जवळ घडलेल्या या
घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. पुढील तपास चिखली पोलीस करित आहेत.
Web Title : pimpri crime murder in chikhali area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update