पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील रुग्णांची संख्या 50 च्या आत आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 18 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 31 रुग्ण बरे झाले आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 259 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 900 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 812 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 196 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 38 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 158 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pimpri Corona Update | A big drop in the number of corona patients in Pimpri Chinchwad find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Aurangabad Crime | पैठण – औरंगाबाद रोडवर महिलेचा खून, प्रचंड खळबळ