पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न (Attempt to Burn Alive) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) येथील स्मशानभूमी आवारात घडला आहे. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) एका विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
सुरज विजय मरळ Suraj Vijay Maral (वय – 28 रा. जिवनधारानगर, धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गोविंदा उर्फ सत्येंद्र यादव Govinda alias Satyendra Yadav (रा. गुजरवाडी, मांगडेवाडी, कात्रज – Katraj) याच्याविरुद्ध भादवी कलम 307,504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज मरळ आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. आरोपी सध्या गुजरवाडी (Gujarwadi) येथे राहण्यास गेला आहे. फिर्यादी यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय (Clothes Selling Business) असून ते घरातून हा व्यवसाय करतात. रविवारी (दि.6) ते व्यवसायातील पैसे गोळा करत असताना रात्री दहाच्या सुमारास आरोपी त्यांना भेटला.
त्यानंतर दोघांनी एका ठिकाणी दारु पिली. त्यानंतर धनकवडी स्मशानभुमी या ठिकाणी जाऊन गप्पा मारत बसले होते. दारूच्या नशेत आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. तसेच जवळ पडलेला सिमेंटचा ब्लॉक (Cement Block) डोक्यात मारुन जखमी केले. सुरज यांनी त्यांच्या वडिलांच्या गाडीत भरण्यासाठी आणलेले पेट्रोल आरोपीने त्यांच्या अंगावर ओतून पेटवून देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे (API Umesh Londhe) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Shocking Attempt to burn a Pune garment trader alive by throwing petrol FIR on one
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Aurangabad Crime | पैठण – औरंगाबाद रोडवर महिलेचा खून, प्रचंड खळबळ
Pune Metro | मेट्रोतून सायकल घेऊन प्रवास करण्यास महामेट्रोची मान्यता