पिंपरी न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. आज शहरात नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या वर आढळून आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) 216 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकही मृत्यू झाला नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 216 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 62 हजार 829 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 209 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 57 हजार 388 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 118 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात शहरातील 01 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (दि.21) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 3065 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 48 हजार 861 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | 216 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Talegaon Dabhade Police | प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त